Diary Of a Single Girl
संडे टाइम्सच्या लाइफ सप्लिमेंटमध्ये येणारा "डायरी ऑफ सिंगल गर्ल' हा माझा प्रचंड लाडका कॉलम. बाकी पेपर मी एवढा मन लावून न का वाचेना! पण या कॉलमची मी दर रविवारी आतुरतेने वाट पाहत असते. (आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनाही जबरदस्तीने वाचायला लावते :) ) या कॉलमच्या लेखिकेबद्दल जाणून घ्यायचीही मला फार उत्सूकता आहे. आणि का असू नये बरं! तिची मते मला खूप आवडतात. कधी कधी तर माझ्यातलीच "मी' त्यात मला दिसते. माझ्या पिढीची (हल्ली मी सारखे बोलते हे दोन शब्द) असणारी मतं ती कुणाचाही मुलाहिजा न राखता एवढ्या रोखठोकपणे मांडते हेच मला जास्त आवडतं आणि कदाचित मला त्याचचं जास्त आकर्षण वाटतं. तिच्याबद्दल "मी' लिखाण करण्याचं आणि त्यावर ब्लॉग वगैरे लिहिण्याचे काय कारण! काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्रामध्ये आणि माझ्यामध्ये तिच्या phylosophy वरून चांगलाच "सुसंवाद' झाला. ""लेखिका उच्चवर्गाचे प्रतिक आहे. or higher middle class ची जरी असली तरी ती जगत असलेली lifestyle 'पैसा' या घटकावर आधारलेली आहे. तिला हवं तसं जगण्यासाठीचं जे मूल्यांकन आहे ते फक्त money या घटकावरच आधारलेलं आहे.'' असा thought झ्या मित्राने मांडला. तो जे बोलला त्यावर मला विचार करण्याची इच्छा झाली.
वाटतं "पैसा' मिळवणं आणि तो उडवणं हा या दशकभरातला ट्रेंड किंवा लाइफस्टाइलच आहे. मग तो हायर क्लास, मिडल क्लास किंवा लोअर क्लास! त्याला कुठल्याही वर्गाचा टॅग लागू होत नाही. त्यात फक्त खर्च करण्याच्या पद्धतींमध्ये बदल होत असतो. हायर क्लासमध्ये ब्रॅंडेड कपडे किंवा कार, फाइव्ह स्टार हॉटेलिंग अशी क्रेझ तर लोअर क्लासमध्ये फॅशन स्ट्रीटवरचे का असेना पण बदलत्या फॅशनचे कपडे किंवा चौपाटी प्रकारावरील (unhygenic) अन्न! पैसे खर्च करण्यासाठीच तर असतात!
मला पैसा या factor पेक्षा तिचा relationship कडे पाहण्याचा दृष्टिकोन भावतो. ती जगते त्याचे पॅरामीटर आपल्या जगण्याला लावण्याचं काहीच कारण नाही. ती जगत असलेली लाइफस्टाइल आपल्याला जगणं कदाचित शक्यही नाही. पण प्रेमात पडणं, प्रेमात सेक्सच्या अपेक्षा असणं, नैतिक-अनैतिकतेचे टॅग या विषयावर तिने मांडलेल्या मतांना मला दाद द्यावीशी वाटते. आणि सर्वांत महत्वाची गोष्ट "मुलगी' असूनही ती ते उघडपणे मांडू शकते. माझी मतं अशी आहेत, पण चारचौघांसमोर मला ती मांडता येत नाहीत किंवा मला ती मांडता येणार नाहीत, अशा भ्रामक जगात वावरणाऱ्या तरुणांपेक्षा मला ती फार स्पष्ट, पारदर्शी आणि स्वच्छ तरी वाटते. प्रत्येक गोष्ट चुकीचं किंवा बरोबर या दोन शब्दांत न अडकवता परिस्थिती काय सांगते आहे, हा तिचा विचार तिच्या व्यक्तिगत आणि सामाजिक स्वातंत्र्य स्पष्ट करतो. पैसा आणि indipendancy हे तिच्या स्वभावामागील महत्वाचे factor असले, तरी प्रत्येकाकडे एवढ्या ताकदीने व्यक्त होण्याचे धाडस नसते. मुळात situation acceptancy हेच तिच्या लेखनाची आणि विचारप्रणालीची वैशिष्ट्ये मला वाटतात. काही वर्षांपूर्वी जगात समाजवादी, कम्युनिस्ट आणि भांडवलशाही अशा विचारधारा होत्या. आणि माणसांच्या पिढ्याच्या पिढ्या त्या विचारधारा follow करत होत्या. आज आम्हाला म्हणून अशी विचारधारा कुठे उरली आहे ? आमची पिढी एकलकोंडी (individualistic) होत चालली आहे, हे विचारधारा नसण्यामागील एक कारण! माणसं नकोत पण त्यांच्याशिवाय जगताही येत नाही! वैयक्तिक स्वातंत्र्य की समाज या confusion बाहेर पडता येऊ शकतं ही विचारधारा diary of single girl देते.
माझ्या मित्राला मला सांगावेसे वाटते, पैसा तर मिळवावाच लागणार आहे. त्याशिवाय गत्यंतर नाही. पण तो मिळवताना तयार होणाऱ्या वैयक्तिक आणि सामाजिक विचारधारांचं काय? आमच्या काळाशी सुसंगत कोणी ते निर्माण करू शकेल? आणि त्याप्रमाणे वागता येइल? या प्रश्नांची उत्तरं मी माझ्या "diary of a single girl' मध्ये शोधतेय ! सापडली तर ठीक.......
(ता. क. : उफ्फ! सात महिन्यांनंतर ब्लॉग लिहिलाय! तोही एवढा सीरिअस! दुसऱ्यांदा वाचून काढल्यावर मलाच धडकी बसतेय! वाचणाऱ्यांची काही खैर नाही :p)
very nicely written..keep it up.. waiting for more..
ReplyDelete