दोन दिवसांपूर्वी माझा वाढदिवस होता. सगळ्यांच्या शुभेच्छा (रोमिंगमध्ये असतानाही) माझ्या स्वीकारताना मनाला आनंद होता होता. एरव्ही मी पुण्यात असतानाही जेवढ्या लोकांनी मला wish केला नसेल इतके फोन काल मला आले. याच निमित्ताने मी सगळ्यांच्या लक्षात असते, याची जाणीवही झाली आणि त्याने मन सुखावलं.
मी जेव्हा चेन्नईला जाणार असं declear केलं तेव्हा माझ्या जवळच्या सगळ्या माणसांनी मला वेड्यात काढला. दिवाळी आहे, त्यात तुझा वाढदिवस आहे, कशाला जायचा आहे तिकडे अशा एक ना अनेक प्रश्नांना उत्तर देत मी इथे पोहोचले. तरीही यंदा पहिल्यांदाच डोक्यात वाढदिवसाचे कुठलेही plan नव्हते.
माझा, माझ्या आत्याचा आणि माझ्या आत्येभावाचा वाढदिवस २६-२७ असा येत असल्यामुळे लहानपणापासून वाढदिवसाची craze असायची. वाढदिवसाचे कित्येक केक आम्ही तिघांनी share केले आहेत. मधल्या काही वर्षाचा gap वगळून यंदा पुन्हा आत्याबरोबर वाढदिवस साजरा करताना धमाल आली. त्यात सगळ्यात जास्त मजा सौरभची (आत्येभावाची) होती. संध्याकाळी आत्याने ऑफिसमधून सौरभला फोन करून "घर आवरून ठेव; मी केक आणतेय, तिला कळू देवू नकोस'' अशा शब्दांत सूचना दिल्या होत्या. त्या त्याने अगदी तंतोतंत पाळल्या.
सकाळीच आत्याने हॉटेल "संगीता'मध्ये जायचं announce केले. तेव्हापासून याच्या डोक्यात starter कुठला? main course कुठला याचे किडे वळवळत होते. केक कापून झाल्यावर आम्ही संगीताकडे आगेकूच केली. जाता जाता माझ्यासाठी कुर्ता खरेदी करण्यासाठी म्हणून गेलो, तर तिथे याची कॉमेंट्री सुरू...! त्या शॉपकीपरला हा म्हणाला, सांगितला होतं ना तुमच्यासाठी एक RC (regular customer) येणार आहे. हे ऐकून मी बेशुद्ध पडायचेच बाकी होते.
शेवटी एकदाचे संगीतात पोहोचल्यावर tomato soup, paneer tikka masala खाऊन झाल्यावर आमची भातावरून हमरीतुमरी झाली.. fried rice मागवण्याचा निर्णय झाल्यानंतर maneger ने येऊन तमिळ भाषेत काहीतरी विचारले. (जे आम्हाला शून्य कळले.) fried rice च्या नावाखाली गाजर आणि ढोबळी मिरची घातलेला पांढरा भात समोर आला.. आयुष्यात पहिल्यांदाच "असा' fried rice खाण्याचा योग वाढदिवसाच्या दिवशी जुळून आला. अशा सुखद धक्क्यांनी भरलेला माझा यंदाचा वाढदिवस कायमचा लक्षात राहील.

G...ONE!!!!
ReplyDelete