Friday, October 28, 2011

दक्षिणायन...

यंदाची दिवाळी माझ्यासाठी आणखी आनंद घेऊन आली आहे. हो...भरपूर शुभेच्छा, मिठाई आणि भेटवस्तूंबरोबरच आणखी एक गोष्ट खास आहे...मी दहा दिवसांच्या सुटीवर इथे चेन्नईत आलेय. मस्त धमाल करतेय...

`सकाळ`मध्ये नोकरीला सुरुवात करून सहा महिने होऊन गेले. बरेच दिवस मोठी सुटी घेतली नव्हती. पुणे आणि तळेगावच्या वा-या करताना दमून गेले होते. I really needed a break!! मला हवा तसा ब्रेक मिळाला, तोही ऐन दिवाळीत. बरेच दिवस चेन्नईच्या आत्याकडेही आले नव्हते. ती माझ्या नावानं ठणाणा करत होती. तिला भेटणंही साध्य झालं, फिरणंही आणि मोठी सुटीही. या वेळी सगळं एकदमच साधायचं ठरवलं.

पुणे ते चेन्नई हा विमानप्रवास अविस्मरणीय झाला. चेन्नईच्या आसमंतात रात्री साडेबाराच्या दरम्यान आम्ही पोहोचलो, तेव्हा तुफान पाऊस सुरू होता. ढगांतून विमान जाताना खूप मजा आली. चेन्नईच्या समुद्रावरून घिरट्या घालताना वीज आणि पावसाचा लपंडाव पाहून डोळ्यांचे पारणे फिटले.

काल माझा वाढदिवसही छान मजेत साजरा झाला. केक, दिवसभर शुभेच्छा आणि संध्याकाळी डिनर, असा शाही बेत होता. डिनरमधले पदार्थ मात्र जसे अपेक्षित होते, त्याच्या अगदी विरुद्ध मिळाले. भाषेचा
problem...काय करणार? आता चेन्नईतल्या उरलेल्या मुक्कामात अशीच आणखी मजा मस्ती करण्याची इच्छा आहे. बघूया...काय काय शक्य होतंय ते....

वेळोवेळी ब्लाॅगवरून तुम्हाला कळवत राहीन....वाचा आणि प्रतिक्रिया अवश्य द्या. सध्या थांबते. पहिल्या ब्लाॅगपोस्टसाठी एवढं पुरे ना?

1 comment:

  1. वा. चेन्नईत मजा मजा चाललेली दिसतेय...दिवाळीचा डबल धमाका...!! मस्त. Enjoy.
    पहिली पोस्ट छान झालेय. पुढच्या पोस्टच्या प्रतीक्षेत आहोत...

    ReplyDelete